Receptionist Cum Telecaller

0 - 31 years

0 Lacs

Posted:2 months ago| Platform: Apna logo

Apply

Work Mode

Remote

Job Type

Full Time

Job Description

नोकरीची संधी – ऑफिस अ‍ॅडमिन व प्रोडक्शन सहायक संस्था: दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूट, पुणे ठिकाण: पुणे (पूर्णवेळ – Full Time) अनुभव: नवीन उमेदवारांना संधी उपलब्ध | अनुभवी उमेदवारांना प्राधान्य *संस्थेची थोडक्यात ओळख* दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूट ही पुण्यातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित अभिनय प्रशिक्षण संस्था आहे. आम्ही अनेक वर्षांपासून अभिनय, दिग्दर्शन, चित्रपट निर्मिती इत्यादी क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण देत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांनी विविध चित्रपट, मालिका आणि नाट्यप्रयोगांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. *पदाचे नाव* ऑफिस अ‍ॅडमिन व प्रोडक्शन सहायक *कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या* ऑफिस अ‍ॅडमिन संबंधित जबाबदाऱ्या: इच्छुक विद्यार्थ्यांना टेलिकॉलिंगद्वारे कोर्सची माहिती देणे संस्थेत चौकशीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कोर्सचे संपूर्ण मार्गदर्शन व समजावून सांगणे विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी सुसंवाद साधणे व सकारात्मक अनुभव देणे ऑफिसमधील दैनंदिन प्रशासन कामकाज हाताळणे (फी पावत्या जमा करून घेणे, फी पावत्याच्या रजिस्टर ठेवणे, उपस्थिती, ईमेल्स, इत्यादी) विद्यार्थ्यांच्या वर्गांचे वेळापत्रक नियोजनपूर्वक तयार करणे व देखरेख करणे प्रोडक्शन संबंधित जबाबदाऱ्या: चित्रपट, वेब सिरीज, व नाटक प्रकल्पांसाठी प्रोडक्शन सहायक म्हणून काम करणे शुटिंगसाठी आवश्यक ते साहित्य, व्यक्ती आणि वेळापत्रक यांचे संयोजन करणे कलाकार, शिक्षक व प्रोडक्शन टीममध्ये संपर्क साधून सहकार्य करणे सेटवर उपस्थित राहून सहकार्य आणि व्यवस्थापन करणे *इतर जबाबदाऱ्या (गरजेनुसार)** इन्स्टिट्यूटशी संबंधित इतर सृजनशील उपक्रमांमध्ये सहभाग विद्यार्थ्यांच्या प्रदर्शन, कार्यशाळा, प्रात्यक्षिक इ. आयोजनात सहभाग *अत्यावश्यक कौशल्ये व अटी* सुसंवाद कौशल्य (Communication Skills) आवश्यक बेसिक संगणक ज्ञान (MS Office, Email, सोशल मीडिया वापर) अनिवार्य टेलिकॉलिंग/सेल्स/स्टुडंट काउंसलिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य मराठी व हिंदी भाषेवर प्रभुत्व आवश्यक, इंग्रजी येणे फायदेशीर एकत्रित टीम म्हणून काम करण्याची वृत्ती, संयम व जबाबदारीची भावना आवश्यक रविवारी सुट्टी नाही – आठवड्यात इतर कोणत्याही एका दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळेल *अतिरिक्त जबाबदाऱ्या (गरजेनुसार)* संस्थेचे प्रतिनिधित्व करताना बाहेरच्या ठिकाणी (शाळा, कॉलेज, इव्हेंट्स इ.) जाऊन PowerPoint प्रेझेंटेशनद्वारे कोर्सची/प्रोजेक्ट ची माहिती देणे विद्यार्थ्यांशी, पालकांशी किंवा संस्थांशी थेट संवाद साधणे आणि प्रेझेंटेशनद्वारे इन्स्टिट्यूटबद्दल जागरूकता निर्माण करणे गरज पडल्यास इतर टीमसह बाह्य प्रचार/प्रसार उपक्रमात सहभागी होणे *कामाचे तास व ठिकाण* पूर्ण वेळ (Full Time) · कामाचे ठिकाण: दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूट, नारायण पेठ, पुणे – 411030 · येण्या-जाण्यासाठी: मोपेड/बाईक आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आवश्यक (फील्ड वर्क किंवा बाह्य प्रेझेंटेशनसाठी गरजेनुसार संस्थेच्या बाहेर जावे लागू शकते) *पगार / मानधन* मुलाखतीनंतर अनुभव आणि कौशल्यांनुसार निश्चित केला जाईल *अर्ज करण्यासाठी*· आपला बायोडेटा/रेझ्युमे नमूद फोननंबर वर पाठवा: +91 7776081199 थेट संपर्क: श्री राजाराम कोरे +91 9850907313 आपण जर…· अभिनय व चित्रपटसृष्टीत काम करण्याची आवड असलेले आहात, · जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करू शकता, · विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात व मदत करण्यात रस आहे… ......…तर ही संधी तुमच्यासाठी आहे! दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूट – अभिनयातलं तुमचं स्वप्न इथून सुरू होतं!

Mock Interview

Practice Video Interview with JobPe AI

Start Job-Specific Interview
cta

Start Your Job Search Today

Browse through a variety of job opportunities tailored to your skills and preferences. Filter by location, experience, salary, and more to find your perfect fit.

Job Application AI Bot

Job Application AI Bot

Apply to 20+ Portals in one click

Download Now

Download the Mobile App

Instantly access job listings, apply easily, and track applications.

coding practice

Enhance Your Skills

Practice coding challenges to boost your skills

Start Practicing Now

RecommendedJobs for You

Borivali West, Mumbai Metropolitan Region

Kudi Bhagatasni Housing Board Colony, Jodhpur